करोना लस लुटीचे वाहतूक कंपन्यांसमोर मोठे संकट

करोना नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील देश लसीकरण मोहीम राबवीत आहेत मात्र या लसीची वाहतूक करणाऱ्या लॉजिस्टिक कंपन्यापुढे लसीची लुट आणि चोऱ्या होण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. परिणामी या कंपन्या लस वाहतूक सुरक्षित व्हावी यासाठी अनेक उपाय योजत आहेत. अर्थात यामुळे शिपिंग कंपन्यांच्या कार्गोची किंमत ७ कोटी डॉलर्स म्हणजे ५०० कोटी रुपयांवर गेली आहे. शिपिंग कंपन्या लस सुरक्षित पोहोचावी म्हणून विविध तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत यामुळे वाहतूक खर्च वाढला आहे.

लस वाहतूक वाहनांवर जादा कर्मचारी नेमणे, जेम्स बॉंड ००७ सारखे डिजिटल स्पाय क्राफ्ट म्हणजे ड्रोन तैनात करणे असे अनेक उपाय योजले जात आहेत. नेदरलंड एचएसर्सने फायझरची लस वाहतुकीसाठी सर्वात अनुभवी ड्रायव्हर नेमले आहेत तर मॉडर्नाची आणि सिनोपॅकची लस स्वित्झर्लंडमध्ये सुरक्षित पोहोचविण्यासाठी पोहो, कुहने नेगल कंपनीने हत्यारबंद जवान तैनात केले आहेत. शिवाय ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरले आहे.

जर्मन एअरकार्गो ट्रान्सपोर्ट जीएमबीएचने वाहनाच्या दरवाजात अलार्म लावले असून त्यातून गवत कापण्याच्या मशीनसारखा कर्णकर्कश्य आवाज येतो. काही कंपन्यांनी किलिंग स्वीच वाहनांत बसविले आहेत असे सांगण्यात येत आहे.