मेगन मार्कलकडून ब्रिटीश राजघराण्याची पोलखोल!


लंडन – पती प्रिन्स हॅरीसोबत ओपरा विन्फ्रेला (Oprah Winfrey) दिलेल्या एका मुलाखतीत राजघराण्यात असताना आपल्या मनात सतत आत्महत्येचे विचार येत असल्याचा खुलासा मेगन मार्केलने केला आहे. राजघराण्याला आपल्या बाळाचा रंग काय असेल याची चिंता होती, असेही मेगल मार्केलने सांगितले आहे. राजघराण्यात आपल्या बाळाच्या रंगासंबंधी चर्चा झाली असल्याची माहिती मेगल मार्केलने मुलाखतीत दिली आहे.

मुलाखतीत मेगनने सांगितले की, कुटुंबातील सदस्यांची प्रिन्स हॅरीसोबत आर्चीच्या जन्माआधी चर्चा झाली होती, त्यांना यावेळी बाळाचा रंग काय असेल याची चिंता सतावत होती. बाळ जन्माला येईल, तेव्हा त्याचा रंग गोरा नसेल याची चिंता असल्याने राजघराणे त्याला प्रिन्स करण्यासाठी तसेच कोणतीही सुरक्षा पुरवण्यास इच्छुक नव्हते. कुटुंबीयांनी आपल्याशी केलेल्या चर्चेची माहिती हॅरीने मला दिली होती. ही चर्चा करणाऱ्या कुटुंबातील सदस्याचे नाव उघड करण्यास मेगनने यावेळी नकार दिला. नाव उघड करणे त्यांच्यासाठी खूप नुकसान करणारे ठरेल, असे मेगनने म्हटले.


यावेळी राजघराण्यात आपण होतो तेव्हा मनात आत्महत्येचे विचार येत होते, असा खुलासाही मेगनने केला आहे. त्याचबरोबर तिने सांगितले की, हे त्यावेळीही हॅरीला सांगण्यास मला लाज वाटत होती की मला अजून जगण्याची इच्छा नव्हती. माझ्या मनात हा एक अगदी स्पष्ट आणि वास्तविक आणि भयानक विचार सतत येत होता. मी मदतीसाठी एका संस्थेत गेली होती. मला मदत मिळवण्यासाठी कुठे तरी गेले पाहिजे, असे मी सांगितले होते. मला याआधी असे कधीच वाटले नसून, कुठेतरी गेले पाहिजे, असे सांगितले. यावर मी असं करु शकत नाही, हे संस्थेसाठी योग्य नसल्याचे सांगण्यात आले, अशी माहिती मार्कलने दिली आहे. गतवर्षी मेगन आणि हॅरी यांनी राजघराण्याचे सदस्यत्व सोडले होते.

मुलाखतीत मेगनने सांगितले की, आपले स्वातंत्र्य राजघराण्याशी जोडले गेल्यानंतर खूप कमी झाले होते. राजघराण्यामुळे मला खपू एकटेपणा आला होता. आपल्याला अनेक दिवस एकटेपणा जाणवत होता. एवढा एकटेपणा याआधी आपल्याला कधीच जाणवला नव्हता. आपल्याला अनेक नियमांनी बांधून ठेवले होते. मला मित्र-मैत्रीणींसोबत बाहेर लंचसाठी जाण्याची मुभादेखील नव्हती.