‘डेटिंग व्हायोलन्स’ म्हणजे नेमके काय?

dating
आजची तरुण पिढी ‘डेटिंग व्हयोलंस’च्या समस्येला तोंड देत आहे. ही समस्या तरुणींच्या बाबतीत अधिक उद्भवताना दिसत आहे. आपल्या जोडीदारासमवेत डेटवर गेल्यानंतर अनेक तरुणींना शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागते, त्यालाच ‘डेटिंग व्हायोलंस’ म्हटले जाते. अशा प्रकारच्या जाचाला सोळा ते तेवीस या वयोगटातील मुली आशिक बळी पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. अलीकडच्या काळामध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणानुसार हे निदान करण्यात आले आहे. पाश्चात्य देशांमध्ये ही समस्या आणखीनच गंभीर बनली आहे.
dating1
अमेरिकेमध्ये डेटिंग व्हायोलंसचे प्रमाण मोठे आहे. ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरामध्ये एकूण दहा टक्के हायस्कूल विद्यार्थ्यांनी, ‘डेट’वर गेले असता, आपला शारीरिक किंवा मानसिक छळ झाल्याची कबुली दिली आहे. हे प्रमाण तरुणींमध्ये तेवीस टक्के तर पुरुषांमध्ये चौदा टक्के इतके असल्याचे सीडीसीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
dating2
डेटिंग व्हयोलंसची ही धक्कादायक आकडेवारी ‘फिजिकल टुडे’ ने प्रकाशित केली असून, सतरा ते तेवीस वर्षीय तरुणी या छळाला अधिक बळी पडत असल्याचे म्हटले आहे. काही केसेस मध्ये तर या छळाला बली पडलेल्या मुलींचे वय बाराहून ही कमी असल्याचे या सर्वेक्षणामध्ये म्हटले आहे. अशा प्रसंगांमधून स्वतःचा बचाव करण्यासाठी भावनेच्या आहारी न जाता अशा प्रकारच्या नातेसंबंधातून बाहेर पडायला हवे, असे तज्ञांचे मत आहे. डेटिंग व्हायोलंस रिलेशनशिपच्या सुरुवातीला क्वचितच दिसून येतो, मात्र याची थोडी जरी लक्षणे जाणवली, तरी ही रिलेशनशिप तेव्हाच थांबविणे इष्ट ठरत असल्याचेही तज्ञ म्हणतात.

Leave a Comment