आजमावून पहा खोकल्यावरचा हा घरगुती उपाय

cough
ऋतू उन्हाळ्याचा असो, किंवा थंडीचा, खोकला हा कोणत्याही ऋतूमध्ये उद्भविणारा आहे. बहुतेकवेळी ऋतू बदलत असताना खोकल्याचा त्रास जाणवत असतो. अनेकांना वाढत्या प्रदुषणामुळेही खोकल्याचा त्रास होत असतो. तर काहींना एखाद्या अॅलर्जीमुळे खोकल्याचा त्रास होत असतो. या खोकल्यावर उपचार म्हणून अनेक घरगुती उपाय केले जात असतात. असाच एक घरगुती उपाय जाणून घेऊ या. या उपायाने खोकला त्वरित बरा होण्यास मदत होते.
cough1
खोकला बरा होण्यासाठी काढा बनविण्याकरिता एक चिमुट हळद, अर्धा इंच आल्याचा तुकडा, चार ते पाच तुळशीची पाने, एक कप पाणी, एक चमचा मध आणि थोडेसे ज्येष्ठमध इतक्या साहित्याची आवश्यकता आहे. हा काढा बनविण्यासाठी एक कप पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यामध्ये हळद, आले, आणि तुळशीची पाने घालावीत. पाणी अर्धे राहीपर्यंत उकळू द्यावे. त्यानंतर ही पाणी गॅसवरून खाली उतरवून घेऊन त्यामध्ये मध घालावे.
cough2
जर घसा खवखवत असेल किंवा दुखत असेल, तर या मिश्रणामध्ये थोडे ज्येष्ठमधही घालावे. हा तयार काढा दिवसातून दोन वेळा घ्यावा. या काढ्यामुळे खोकला बरा होण्यास मदत होतेच, त्याशिवाय घशातील इन्फेक्शनही याने दूर होते. तसेच या काढ्याच्या नियमित सेवनाने वारंवार होणारा खोकला टाळता येतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment