घरामध्ये मनी प्लांट लावताना या गोष्टींचा असावा विचार

money-plant
अनेक घरांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये मनी प्लांट ठेवलेले पहावयास मिळते. मनी प्लांट वास्तूमध्ये असल्याने वास्तूमध्ये नेहमी सकारात्मक उर्जेचे संचारण होत असून, सुख समृद्धी नांदते. या उद्देशानेच वास्तूमध्ये मनी प्लांट ठेवण्याची पद्धत रूढ आहे. पण अनकेदा मनी प्लांट वास्तूमध्ये ठेवताना ते नेमके कुठे ठेवले जावे या बद्दल लोकांना माहिती नसते. मनी प्लांट घरामध्ये किंवा कार्यालयामध्ये ठेवण्यासोबतच ते योग्य ठिकाणी ठेवले जाणेही तितकेच महत्वाचे असते. त्यामुळे मनी प्लांट वास्तूमध्ये ठेवताना काही गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे आहे.
money-plant1
मनी प्लांट घरामध्ये किंवा कार्यालयामध्ये कधीही उत्तर-पूर्व दिशेला, म्हणजेच ईशान्येला असू नये. मनी प्लांट लावण्यासाठी ही दिशा नकारात्मक मानली गेली आहे. या दिशेला मनी प्लांट लावल्याने आर्थिक सुबत्तेऐवजी आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे घरामध्ये किंवा कार्यालयामध्ये मनी प्लांट लावल्यास ते कधी पाण्याअभावी सुकून जाणार नाही याची काळजी घ्यावी. मनी प्लांट सुकून जाणे नकारात्मक प्रभाव आणणारे मानले गेले आहे. मनी प्लांटच्या फांद्या कधीही कुंडीतून खाली जमिनीवर पसरणार नाहीत यांची दक्षता घ्यावी. जमिनीवर पसरणाऱ्या मनी प्लांटच्या फांद्या अधोगतीसाठी कारणीभूत ठरू शकतात. मनी प्लांटची वेल नेहमी वर चढविली जाईल याची काळजी घ्यावी.
money-plant2
वास्तूशास्त्राच्या अनुसार मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेला लावले जावे. दक्षिण पूर्व दिशा, आग्नेय दिशा म्हणून ओळखली जाते. ही दिशा जल तत्वाची दिशा मानली गेली असून, या दिशेचा प्रतिनिधी शुक्र आहे. या दिशेला ठेवलेले मनी प्लांट वास्तूमध्ये शांती, सकारात्मक उर्जा आणि सुखसमृद्धी वाढविणारे ठरत असल्याचे वास्तूशास्त्र म्हणते.

Leave a Comment