कलोन्जीचे तेल- उपयोग, फायदे आणि दुष्परिणाम

oil2
काळ्या तिळाप्रमाणे दिसणाऱ्या कलोन्जीला कांद्याचे बी म्हणून ही ओळखले जाते. यालाच इंग्रजीमध्ये ‘नायजेला सीड्स’ म्हटले जाते. भारतामध्ये मसाल्याचा पदार्थ म्हणून काहीशी कडवट चव असलेली कलोन्जी वापरली जात असते. या कलोन्जीपासून तयार करण्यात येणारे हे तेल अनेक समस्यांवर उत्तम औषध समजले जाते. या तेलामध्ये अँटी ऑक्सिडंट्स ही मोठ्या प्रमाणात आहेत. या तेलाचा वापर अनेक तऱ्हेच्या अॅलर्जी, दमा, मधुमेह, डोकेदुखी, उच्च रक्तदाब, पचनासंबंधी तक्रारी, आणि संधीवातासारख्या समस्येवर उपचारांसाठी केला जातो. या तेलाच्या वापरामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली रहात असून, शरीरावर कुठे सूज असल्यास किंवा इन्फेक्शन असल्यास ते या तेलाच्या वापराने आटोक्यात येते. या तेलाचा वापर त्वचेचा आणि केसांचा कोरडेपणा नाहीसा करण्यासाठी केला जातो. याच्या वापराने केसांची चांगली वाढ होते.
oil1
ज्यांना वारंवार सर्दी होऊन नाक बंद होत असेल, त्यांच्यासाठी कलोन्जीचे तेल लाभदायक आहे. तसेच संधिवातासाठी देखील या तेलाचे सेवन उपयुक्त आहे. या तेलाच्या सेवनाने ग्लुकोजची आणि कोलेस्टेरोलची पातळी नियंत्रणात रहात असल्याने मधुमेह असणाऱ्यांसाठी हे तेल फायद्याचे आहे. या तेलाचे अनेक फायदे असले, तरी या तेलाच्या वापरामुळे उद्भवू शकणाऱ्या दुष्परिणामांची यादीही मोठी आहे. हे तेल त्वचेवर लावल्याने बारीक पुरळ आल्याच्या काही केसेस पाहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे या तेलाचा वापर करण्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. या तेलाच्या अतिवापराने लिव्हर आणि किडनीचे कार्य बिघडू शकते. तसेच इतर कोणत्या कारणासाठी औषधोपचार सुरु असले तर त्याच्या जोडीने या तेलाचे सेवन करणे टाळावे. गर्भवती महिला आणि नुकतीच प्रसूती झालेल्या महिलांनी ही या तेलाचे सेवन करू नये.
oi
हे तेल सर्वसामान्य दुकानांमध्ये उपलब्ध नसले, तरी याचे अनेक ब्रँड्स ऑनलाईन उपलब्ध आहेत. मात्र या तेलाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment