बंगळुरु: ब्रिटनस्थित बॅंकिंग आणि फायनान्शिएल सर्व्हिस सेक्टरची सेवा देणारी कंपनी Capco ची भारतातील दिग्गज समजली जाणारी आयटी कंपनी विप्रोने तब्बल 105 अब्ज रुपयांना खरेदी केली आहे. याबाबत विप्रोने अधिकृत निवेदन जारी केले आहे.
भारतातील या दिग्गज आयटी कंपनीने तब्बल 105 अब्ज डॉलरला खरेदी केली ब्रिटिश कन्सल्टन्सी फर्म
येत्या काळात विप्रो बॅंकिंग आणि फायनान्शिएल सर्व्हिस सेक्टरमध्ये भक्कमपणे पावले टाकेल, असेही कंपनीच्या निवेदनात सांगण्यात आल्यामुळे Capco च्या खरेदीमुळे या क्षेत्रातील नवीन ग्राहकांना कंपनी आकर्षित करेल, असा आत्मविश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
ब्रिटनच्या Capco या कंपनीच्या 30 शाखा असून त्यामध्ये पाच हजार कर्मचारी काम करत आहेत. विप्रोचा आणि Capco चा हा संपूर्ण व्यवहार कॅशच्या स्वरुपात होणार आहे. 30 जून 2021 पर्यंत हा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विप्रोकडून करण्यात आलेला हा व्यवहार आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यवहार आहे. लंडनमध्ये Capco चे मुख्यालय आहे. या कंपनीच्या माध्यमातून बॅंकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिस सेक्टरमध्ये जगभरातील कंपन्यांना सेवा उपलब्ध करुन देण्यात येतात.
विप्रोच्या नफ्यात गेल्या वर्षी शेवटच्या तिमाहीत 20.8 टक्क्यांची भर पडली होती. या कंपनीचा शेवटच्या तिमाहीतील एकूण फायदा हा 2967 कोटी रुपये एवढा होता. याचबरोबर कंपनीच्या उत्पन्नात 1.3 टक्क्यांची वाढ झाली असून ती 15,670 रुपयांवर पोहोचली आहे.