मुंबई : सध्या कोरोना लसीकरणच्या मोहिमेला देशभरात सुरुवात झाली असून 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्यालादेखील सुरुवात झाली आहे. दरम्यान लसीकरणासंदर्भात रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाच्या लसीकरणाचा सर्व खर्च स्वत: करणार आहे.
नीता अंबानींची मोठी घोषणा, रिलायन्सच्या सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळणार कोरोनाची मोफत लस
याबाबत माहिती देताना नीता अंबानी म्हणाल्या, आपण सर्वजण कोरोनावर लवकरच मात करूच परंतु तोपर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात असून मी आणि मुकेश अंबानी यांनी निर्णय घेतला की, रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबातील सदस्यांना आम्ही विनामूल्य लस देणार आहेत.
लस ज्या कर्मचाऱ्यांना घ्यायची आहे. त्यांनी सरकारी पोर्टलवर नोंदणी करावी. जेणेकरून आपण कोरोनावर लवकरात लवकर मात करू शकू, असे आवाहन देखील नीता अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला आहे.