राणा दग्गुबतीच्या ‘हाथी मेरे साथी’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज


‘बाहुबली’ फेम राणा दग्गुबत्ती याच्या आगामी ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा चित्रपट संपूर्ण देशात तीन भाषांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. आज या चित्रपटाचा हिंदी भाषेतील ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे.

राणा दग्गुबतीने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे, तर ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाची पटकथा ही एका माणसाच्या आयुष्यावर आहे. ज्याने आयुष्यातील बराच काळ जंगलात घालवला आणि त्याचे आयुष्य पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी समर्पित केले आहे. माणूस आणि हत्ती यांच्यातील मैत्रीची ही गोष्ट आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून जंगल आणि हत्तींचे संरक्षण करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पुलकित सम्राट, श्रिया पिळगावकर आणि जोया हुसेन हिंदी भाषेतील चित्रपटाच्या व्हर्जननध्ये मुख्य भूमिकेत झळकतील. हा चित्रपट तेलगू आणि तमिळमध्ये देखील प्रदर्शित होणार असून ‘आरण्य आणि कदान’ असे त्याचे नाव असणार आहे. 26 मार्चला चित्रपट संपूर्ण देशात रिलीज होणार आहेत. हा चित्रपट तीन भाषेत रिलीज होत असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपट चांगली कमाई करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खरे तर राणासाठी एकच चित्रपट अनेक भाषेत करण्याचा ट्रेंड नवा नाही. याआधी ‘बाहुबली’ आणि ‘गाजी अटॅक’ हे त्याचे चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाले होते.