विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार


मुंबई : विदर्भ मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. अधिकचा निधी देऊ. विदर्भ व मराठवाडा विकास मंडळ झाले पाहिजे या विचाराचे हे सरकार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात मुद्दा मांडला होता. त्यावर बोलताना अर्थमंत्री पवार म्हणाले की, विदर्भ मराठवाडा विकास मंडळ स्थापन करुन या भागाचा विकास करण्याची आमची भूमिका आहे. जी विकास मंडळे आहेत ती गृहीत धरुन त्याप्रमाणे निधीचे वाटप करण्यात येईल. विकास मंडळ अस्तित्वात असल्यापासून ज्याप्रकारे निधीचे वाटप झाले त्याचप्रमाणे वाटप झाले पाहिजे. कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.