कार्तिक आर्यनच्या आगामी ‘धमाका’ चित्रपटाचा भन्नाट टीझर रिलीज


‘धमाका’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉमवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर आजच रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हा टीझर शेअर करत कार्तिकने चाहत्यांना त्याच्या आगामी चित्रपटाची कल्पना दिली आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कार्तिकने हा ट्रेलर शेअर केला आहे. कार्तिक टीझरमध्ये एका न्युज अॅकरच्या भूमिकेत दिसत आहे. कार्तिक टीझरच्या सुरूवातीला न्युजरूममध्ये बसून किंचाळतो आणि बोलतो बंद करा हा कॅमेरा, बंद करा. कोणत्या तरी शोसाठी तो नकार देताना दिसत आहे. तर त्याची एडिटर त्याला म्हणते, द शो मस्ट गो ऑन. कार्तिक बोलतो, मी हे नाही करू शकत. नंतर कार्तिक स्वत:ला सांभाळत कॅमेरा फेस करतो आणि बोलतो, मी आहे अर्जुन पाठक भरोसा २४/७ मधून…मी जे पण बोलेन ते सत्य बोलेन.. हा टीझर शेअर करत, मी अर्जुन पाठक आहे. मी जे पण बोलेन ते सत्य बोलेन, अशा आशयाचे कॅप्शन कार्तिकने दिले आहे.

कार्तिकच्या भूमिकेचे या चित्रपटात नाव अर्जुन पाठक आहे. या चित्रपटाची पटकथा मुंबईवर आधारित आहे. यात एक अनोळखी व्यक्ती अर्जुनला फोन करून वरळी सीलिंकवर ब्लास्ट करण्याची धमकी देतो. २२ नोव्हेंबर २०२० रोजी कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त ‘धमाका’ या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आली होती. या चित्रपटात कार्तिक सोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर, अभिनेता विकास कुमार आणि विश्वजित मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राम माधवानी यांनी केले आहे. ‘धमाका’ नेटफ्लिक्सवर १९० देशांत प्रदर्शित होणार आहे.