लाहोर – सध्या सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया पात्र ठरल्यास आशिया चषक स्पर्धा पुढे ढकलली जाईल. त्याचबरोबर आशिया चषक 2021 यंदा जून महिन्यात आयोजित होणार आहे, पण स्पर्धेच्या तारखा त्याच महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलशी जुळत असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी म्हटले आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना आशिया चषक 2021 यासह अनेक विषयांच्या प्रश्नांना संबोधित केले.
टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडिया पात्र ठरल्यास स्थगित होऊ शकते आशिया चषक स्पर्धा
मणी म्हणाले की, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामुळे बहु-देशी स्पर्धा 2023 पर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते. भारताला इंग्लंडविरुद्ध सध्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी मालिकेच्या अंतिम सामन्यात विजय किंवा किमान सामना ड्रॉ करण्याची गरज आहे.
आम्ही गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये श्रीलंका येथे होणारी आशिया चषक स्थगित केली होती. तथापि, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपशी त्याच्या तारखा जुळत आहे आणि म्हणूनच आता 2023 मध्ये ही स्पर्धा होईल, मनी म्हणाले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18-22 जून दरम्यान लॉर्ड्स येथे होणार आहे. शिवाय, आयसीसीने त्यांना पुढील महिन्यात वर्ल्ड टी-20 कप स्पर्धेसाठी सर्व खेळाडू, अधिकारी, चाहते आणि पत्रकारांना व्हिसा देण्यात येणार असल्याचे बीसीसीआयकडून लेखी आश्वासन मिळणार असल्याचे आश्वासन दिल्याचे मनी यांनी सांगितले.
बोर्डाला मी कळविले आहे की आम्हाला 31 डिसेंबरपर्यंत बीसीसीआय व्हिसाची हमी देईल, पण तसे झाले नाही कारण त्यांचे अध्यक्ष, सौरव गांगुली यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पत्रकार परिषदेत ते म्हणाले. पण आता हे प्रकरण मी पुन्हा आयसीसीकडे उचलले आहे आणि त्यांच्या संपर्कात आहे. उद्या या विषयावर त्यांच्याबरोबर माझी आणखी एक व्हर्च्युअल बैठक आहे. आम्हाला पुढील महिन्याच्या अखेरीस आपली लेखी हमी मिळेल, असे आयसीसीने आम्हाला सांगितले.
पीसीबी प्रमुख म्हणाले की, या आश्वासनाची मागणी करणे हा त्यांचा अधिकार आहे आणि कोणीही पाकिस्तानला वर्ल्ड कपपासून दूर ठेवू शकत नाही. ते म्हणाले की, एकतर आम्ही पूर्ण वर्ल्ड टी-20 कपमध्ये जाणार किंवा तो इतर कोणत्याही ठिकाणी खेळवावा.