मेक्सिकोमध्ये भाज्या पिकविण्यासाठी वापरली जात आहे अनोखी पद्धत

farming
मेक्सिकोमध्ये भाज्या पिकविण्यासाठी आजच्या काळामध्ये ही नवी पद्धत वापरली जात असली, तरी ही पद्धत मात्र अनेक शतकांपूर्वीच विकसित करण्यात आली होती. या पद्धतीमध्ये मोठमोठ्या टाक्यांतील पाण्यामध्ये मासे सोडले जातात. या टाक्यांवरील झाकाणांवर भाज्या लावण्यात येत असून, या भाज्यांची मुळे झाकाणांतील छिद्रांमधून टाक्यांमधील पाण्यापर्यंत पोहोचत असतात. टाक्यांमधील माशांच्या विष्ठेमधील तत्वांमुळे या भाज्यांच्या मुळांना आवश्यक ती सर्व पोषक तत्वे मिळत असून, त्यामुळे या भाज्यांसाठी वेगळ्या खतांचा वापर करावा लागत नाही.
farming1
लागवडीची ही पद्धत ‘मायन’ आणि ‘अॅझ्टेक’ संस्कृतीच्या काळापासून अस्तित्वात असून, त्याकाळी पाण्यावर तरंगणाऱ्या पेट्यांमध्ये भाज्या पिकविल्या जात असत. पाण्यावर तरंगणाऱ्या या पेट्यांना ‘चीनाम्पा’ म्हटले जात असे. अतिशय प्राचीन असलेली शेतीची ही पद्धत आता एकविसाव्या शतकामध्ये मेक्सिकोमध्ये पुनश्च वापरण्यात येत असून या अनोख्या शेतीच्या पद्धतीला ‘अॅक्वापोनिक्स’ म्हटले जाते. या शेतीच्या पद्धतीमध्ये रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर अजिबात केला जात नाही. तसेच सामान्य शेतीउत्पादनामध्ये लागते त्याच्या केवळ दहा टक्के पाण्याचा वापर या शेतीमध्ये केला जातो.
farming2
ही शेती कितीही लहान किंवा मोठ्या जागेमध्ये केली जाऊ शकत असून, या साठी वापरण्यात येणाऱ्या टाक्यांमध्ये मत्स्यपालन आणि भाज्या पिकवण्याचे काम एकाच वेळी, वर्षभर केले जाऊ शकते. या अनोख्या शेतीपद्धतीमुळे जगभरातील शेतीची संकल्पना बदलली जाऊन अधिक उत्पादन शक्य होऊ शकते.

Leave a Comment