मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज युसूफ पठाणने निवृत्ती घेत असल्याचे जाहिर केले आहे. याबाबतची माहिती युसूफने ट्विट करत दिली आहे. यूसूफने त्याच्या कुटुंबियांचे, टीम इंडियातील सहकाऱ्यांचे, संघ व्यवस्थापनाचे, सर्व चाहत्यांच्याचे आणि त्याच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडाखेबाज फलंदाज युसूफ पठाणची निवृत्ती
युसुफ निवृत्तीची घोषणा करताना म्हणाला की, दोन वर्ल्ड कप भारतासाठी जिंकणे आणि सचिन तेंडुलकरला खांद्यावर घेऊन जाणे हे माझ्या कारकिर्दीतील अविस्मरणीय क्षण होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शेन वॉर्नच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये डेब्यू केले. तसेच आयपीएलमध्ये कोलकातासाठी गौतम गंभीरच्या नेतृत्वात दोनदा विजेतपद पटकावले, यासाठी गौतम गंभीरचा मी आभारी असल्याचे आपल्या ट्विटमध्ये युसूफने नमूद केले आहे.