मुंबई : 25 फेब्रुवारी रोजी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शनासाठी ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली.
२५ फेब्रुवारीला जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रियेच्या मार्गदर्शनासाठी वेबिनारचे आयोजन
01 ऑगस्ट, 2020 पासून सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, सेवा, निवडणूक व इतर कारणाकरीता वैधता प्रमाणपत्रासंदर्भात अर्जदारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज स्वीकारण्यात येत आहेत, अर्जनिहाय सेवा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय देखील (Payment Gateway) उपलब्ध करण्यात आलेली आहे.
वैधता प्रमाणपत्र पडताळणीच्या प्रक्रियेबाबत बरेच अर्जदार अद्याप अनभिज्ञ आहेत. अर्जदारांना अर्ज भरताना पुढीलप्रमाणे अडचणी येतात उदा. कोणत्या प्रकारे अर्ज भरावा व कोणते दस्तऐवज जोडावे, जाती दावा सिध्द करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पुरावे इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे स्तरावर गुरुवार 25फेब्रुवारी, 2021 रोजी ऑनलाईन वेबिनारचे (Webinar) आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व अर्जदार, पालक व विद्यार्थी यांनी या ऑनलाईन वेबिनारचा (Webinar) लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.