रामदेव बाबांच्या कोरोनीलच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी


मुंबई: कोरोना व्हायरसवरचे अधिकृत तथा प्रमाणित औषध योगगुरु रामदेव बाबा यांनी बाजारात आणले आहे. या औषधाचे कोरोनील असे नाव असून या औषधाच्या विक्रीवर महाराष्ट्रात राज्य सरकारने विक्रीवर बंदी घातल्यामुळे रामदेव बाबा यांना मोठा झटका बसला आहे.


रामदेव बाबांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून मोठा झटका दिला आहे. आयएमएने पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर प्रश्न उपस्थित केले असून जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा दावा फेटाळला आहे. हे औषध एवढ्या घाईने बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणे योग्य नसल्याचे सांगतानाच जागतिक आरोग्य संघटना आणि आयएमए व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनील औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, असे देशमुख यांनी स्पष्ट केल्यामुळे रामदेव बाबांची चांगलीच कोंडी झाली आहे.