अधिवेशनाच्या तोंडावर मंत्रालयातील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


मुंबई – आता पुन्हा एकदा राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. सर्वसामान्यांसह व्हीव्हीआयपी व्यक्ती देखील कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. राज्यातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्याचबरोबर राज्याचे आरोग्यमंत्री, गृहमंत्री हे देखील कोरोनाच्या विळख्यात सापडलेले आहेत. दरम्यान आता मंत्रालयात देखील कोरोनाने पुन्हा एकदा प्रवेश केला असुन, कोरोनाची बाधा महसुल विभागाच्या आठ कर्मचाऱ्यांना झाल्याचे समोर आले आहे.

एवढ्या संख्येने एकाच विभागात कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. महसुल विभागात आज २२ जण गैरहजर होते, त्यातील आठ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर उर्वरीत जण अन्य आजाराने त्रस्त असल्याने ते गैरहजर असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.