करायला गेले एक..!

cat
मिसिसिपीमधील पास्कागुला भागामध्ये राहणारी ब्रूक स्नो आपल्या मुली समवेत घरात असताना आपली पाळीव मांजर काही वेळापासून दृष्टीस पडली नसल्याचे तिच्या लक्षात आले. मांजरीचा शोध घेण्यासाठी ब्रूक आणि तिची लेक घराबाहेर आल्या आणि घराजवळ असलेल्या ड्रेनमध्ये तर मांजर शिरली नाही हे पाण्यासाठी त्यांनी ड्रेनचे झाकण उघडले मात्र, भीतीने त्यांचा थरकाप उडाला. घराजवळील ड्रेनमध्ये मांजरीचा पत्ता नव्हताच, पण मांजर शिरली असेल या अपेक्षेने ड्रेनचे झाकण उघडताच तब्बल सात फुट लांबची मगर मात्र या ड्रेनमध्ये शिरून बसलेली ब्रूकने पहिली.
cat1
सुरुवातीला आपण नक्की काय पहिले हे ब्रूक आणि तिच्या मुलीला क्षणभर समजलेच नाही, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या वेळी जेव्हा लक्षपूर्वक पहिले तेव्हा ड्रेनमध्ये शिरून बसलेली मगर त्यांच्या दृष्टीला पडली. ब्रूकने झपाट्याने आपल्या मोबाईल फोनवर या मगरीचे छायाचित्र घेतले आणि त्यानंतर त्वरित ‘ अॅनिमल कंट्रोल’ विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. संबंधित अधिकारी ब्रूकच्या घरी आल्यावर ड्रेन मध्ये असणारी इतकी मोठी मगर पाहून त्यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्याचे ठरविले.
cat2
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी येऊन ही मोठी मगर ड्रेनमधून बाहेर काढण्यात यश मिळविले. ही मगर ड्रेनमधून बाहेर काढली जात असतानाचा व्हिडियो फेसबुकवर शेअर केला गेला असून, या व्हिडियोला आता पर्यंत हजारो ‘व्ह्यू’ मिळाले आहेत. तसेच पास्कागुलाच्या स्थानिक प्रशासनातर्फेही हा व्हिडियो शेअर केला गेला असून, ब्रूकने संबंधित अधिकाऱ्यांना योग्य वेळी संपर्क केल्याने ही मगर ड्रेनमधून बाहेर काढली जाऊन सुरक्षित स्थळी तिला सोडून दिले गेले असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Comment