तृतीयपंथीय फक्त एका रात्रीसाठी का आणि कोणासोबत करतात लग्न ?

trans
अरावन देवतेची पुजा करण्याची प्रथा तामिळनाडूमध्ये असून इरावन असेही यांना म्हटले जाते. येथे या देवाला तृतीयपंथीयांची देवता असल्याचेही संबोधले जाते. महाभारतातील प्रमुख पात्रांमधील एक अरावन देवता होते आणि त्यांनी युद्धामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली होती. तृतीयपंथीयांना दक्षिण भारतात अरावनीही म्हटले जाते. वर्षातून एकदा तृतीयपंथीय आणि अरावन देवतेचा विवाह होत असतो. पण हा विवाह केवळ एका दिवसाचा असतो. या देवतेचा दुस-या दिवशी मृत्यू होतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर विवाह केलेले तृतीयपंथी विधवा होतात.
trans1
महाभारताच्या कथेनुसार, द्रौपदीसोबत लग्न झाल्यानंतर पांडवांनी तिच्यासंदर्भात एक नियम केला होता त्या नियमाचे अर्जुनाने एकदा पालन न केल्यामुळे त्याला इंद्रप्रस्थमधून बाहेर काढून देण्यात आले होते. एका वर्षासाठी अर्जुनाला तीर्थयात्रेला पाठवण्यात आले. अर्जुन तेथून निघाल्यानंतर उत्तर पूर्व भारतात गेले. त्याची भेट तेथे एका नागकन्या उलुपीबरोबर झाली. दोघे एकमेकांवर प्रेम करू लागतात. उलूपी आणि अर्जुन काही दिवसानंतर विवाह करतात. उलुपी विवाहानंतर काही काळाने एका मुलाला जन्म देते. ती त्याचे नाव अरावन ठेवते. अर्जुन आपल्या मुलाच्या जन्मानंतर त्या दोघांना सोडून पुढच्या यात्रेसाठी निघून जातो. नागलोकात अरावन आपल्या आईबरोबरच राहत असतो. तो तरुणपणी नागलोक सोडून आपल्या पित्याकडे येतो. कुरूक्षेत्रात तेव्हा महाभारताचे युद्ध सुरू असते. अर्जुन त्यामुळे त्याला युद्धासाठी रणभूमीत पाठवतो.
trans2
एक अशी वेळ महाभारताच्या युद्धात येते जेव्हा पांडवांना विजयासाठी काली काली मातेच्या चरणी स्वच्छेने एक नरबळी द्यायचा असतो. अरावन त्यावेळी स्वतः त्यासाठी पुढे येतो. परंतु अविवाहीत राहून बळी देणार नसल्याचे अरावन सांगतो. सगळ्यांसमोरच त्यावेळी समस्या उभी राहते. आपली मुलगी दुस-याच दिवशी विधवा होईल म्हणून कोणीही त्याच्याबरोबर मुलीचा विवाह लावून देण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे श्री कृष्ण स्वतः मोहिनी रूप धारण करून अरावनबरोबर विवाह करतात. दुस-या दिवशी अरावत स्वतः आपले शीर काली मातेला अर्पण करतो. अरावनच्या मृत्यूनंतर श्रीकृष्ण त्याचरुपात बराच काळ दुःख व्यक्त करतात. श्री कृष्ण पुरुष असून स्त्री रुपात अरावनबरोबर विवाह करतात. त्यामुळे स्त्री रुपातील पुरुष म्हणून ओळखळे जाणारे तृतीयपंथी ही अरावन देवतेशी एका रात्रीपुरता विवाह करत असतात. व त्यांनाच अराध्य देवता मानतात.
trans3
दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात तामिळनाडूमधील कूवगम गावात 18 दिवस चालणारा उत्सव साजरा केला जातो. त्यासाठी देशभरातून तृतीयपंथी जमा होत असतात. सुरुवातीचे 16 दिवस गाण्यांवर नाचगाणे सुरू असते. अत्यंत उत्साहाच्या वातावरणात विवाहाची तयारी सुरू असते. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट सुरू असतो. 17 व्या दिवशी पुजारी 17 एक खास पुजा करतात. नारळाची भेट देवाला दिली जाते. त्यानंतर अरावन देवासमोर पुजा-याकडून तृतीयपंथीचांच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते. त्याला थाली म्हटले जाते. नंतर मंदिरात अरावनाच्या मूर्तीशी विवाह लावला जातो. अखेरच्या म्हणजे 18 व्या दिवशी कूवगम गावात अरावनाच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते. नंतर ती मूर्ती नष्ट केली जाते. त्यानंतर नवरी बनलेले तृतीयपंथी त्यांचे मंगळसूत्र तोडून टाकतात. तसेच चेह-यावरील श्रृंगारही काढला जातो. नंतर ते पांढरे वस्त्र परिधान करतात आणि दुःख व्यक्त करतात.

Leave a Comment