कंबरदुखी,सूज,लचक यावर गुणकारी तमालपत्र

tamalpatr
भारतातील प्रत्येक घरात स्वयंपाकघरात जे अनेक मसाल्याचे पदार्थ वापरले जातात त्यात तमालपतत्राचा समावेश असतोच. विशिष्ट वास असलेला हे पान मसाले भात, पुलाव यांना वेगळाच स्वाद देते. मात्र हेच तमालपत्र अनेक आजारात अतिशय गुणकारी ठरते. विशेषतः वेदना देणाऱ्या व्याधीमध्ये ते फार उपयुक्त आहे.

कंबरदुखी, लचक भरणे, सांधे सूज याचा त्रास अनेकांना होत असतो. त्यावर तमालपत्र चांगले उपयोगी पडते. तमालपत्राला तेज पत्ता असेही म्हटले जाते आणि त्याच्या तेलात अनेक औषधी गुण आहेत. तमालपत्र अँटी बॅक्टेरीअल, अँटीफंगल, अँटी इन्फ्लेमेंटरी, पेन रिलिव्हर बाम आणि जेल अश्या असुशाडत वापरले जाते. तमालपत्रात कॉपर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेमिनीयम, आयर्न असून त्यामुळे कॅन्सर, गंभीर हृद्यरोग, रक्ताची गुठळी होणे यापासून बचाव होतो.

kamar
१० ग्रॅम ओवा, ५ ग्रॅम बडीशेप आणि १० ग्रॅम तमालपत्र यांची बारीक पूड १ लिटर पाण्यात उकळवून ते पाणी १५० मिली करावे. गार झाल्यावर हा काढा घेतल्यास जुनाट कंबरदुखी बरी होते. थंडीत याच्या तेलाचे मालिश केल्यास उब मिळते तसेच लचक भरली असल्यास तमालपत्र कुटून त्याचा लेप दिल्यास आराम पडतो.

नसा आखडणे,. त्यामुळे येणारी सूज, होणाऱ्या वेदना, नसांवर दाब येण्यामुळे होणार्या वेदना यावरही तमालपत्र काढा उपयुक्त ठरतो. सूज आलेल्या ठिकाणी दालचिनी, लवंग आणि तमालपत्र पाणी घालून बारीक वाटावे व त्याचा लेप द्यावा. सूज उतरते.

Leave a Comment