वजन घटविण्याकरिता बडीशेप उपयुक्त

saauf
बडीशेपेचे प्रमाणामध्ये सेवन आरोग्यासाठी उपयुक्त असून, याच्या सेवनाने अनेक आजारांमध्ये लाभ मिळत असल्याचे म्हटले जाते. जवळजवळ प्रत्येक घरामध्ये आवर्जून सापडणारा हा पदार्थ मुखवास म्हणून वापरला जातोच, त्याचबरोबर काही खास पदार्थ बनविण्यासाठी त्यांच्या मसाल्यामध्ये देखील बडीशेपेचा वापर केला जातो. तसेच श्वसनाशी निगडीत समस्या, दमा, मधुमेह, पोटामध्ये होणारे गॅसेस, आणि पचनाशी निगडीत इतर समस्यांवरही बडीशेप गुणकारी आहे. पण या समस्त विकारांसोबतच वजनावर नियंत्रण मिळविण्यासही बडीशेप गुणकारी आहे. बडीशेपेमध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंटस्, क्षार मोठ्या प्रमाणावर असून, ही तत्वे वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यास सहायक असतात. आयुर्वेदामध्येही बडीशेपची उपयुक्तता मोठी असून, अनेक व्याधींवरील औषधांमध्ये याचा वापर केला जातो.
saauf1
बडीशेपेमध्ये फायबर मोठ्या प्रमाणामध्ये असून, त्याच्या सेवनाने पोट जास्त वेळ भरलेले राहून भूक लागण्याची भावना कमी होते. तसेच बडीशेपेच्या सेवनाने अन्नातील इतर पोषक घटक शरीरामध्ये अवशोषित होण्यास मदत होते. बडीशेपेमध्ये ‘डाययुरेटिक’ गुण असल्याने याने लघवीचे प्रमाण वाढते, परिणामी विषारी, घातक द्रव्य शरीराबाहेर टाकण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळेही वजन घटण्यास मदत होते. बडीशेपेच्या सेवनामुळे शरीरातील चयापचय शक्ती सुधारत असून, त्यामुळे वजन नियंत्रणामध्ये राहते.
saauf2
बडीशेपेमध्ये फॉस्फरस, सेलेनियम, झिंक, मँगनिझ, कोलाईन, बीटा कॅरोटीन इत्यादी अँटी-ऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणावर असून, हे शरीराचे ‘फ्री रॅडीकल्स’ पासून रक्षण करतात. तसेच यामुळे पचनक्रिया सुरळीत राहून त्याच्याशी निगडीत तक्रारी दूर होण्यास मदत होते. वजन नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी तसेच इतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी बडीशेपेचा वापर निरनिरळ्या प्रकारे करता येऊ शकतो. यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये दोन लहान चमचे बडीशेप रात्रभर भिजत घालावी. सकाळी उठल्यानंतर इतर काही खाण्यापिण्याच्या आधी या बडीशेपेच्या पाण्याचे सेवन करावे. त्याचप्रमाणे दोन ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे बडीशेप घालून, या पाण्याला एक उकळी आणावी. हे पाणी जास्त उकळू नये, अन्यथा बडीशेपेतील सर्व पोषक घटक नष्ट होतील. एक उकळी आल्यानंतर हे पाणी दहा मिनिटे झाकून ठेवावे, आणि त्यानंतर गाळून घेऊन याचे दिवसातून तीन वेळा सेवन करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment