भाजप महिला कार्यकर्तीच्या कारमध्ये पोलिसांना सापडले लाखोंचे कोकेन


अलीपूर : बॉलीवूडमधील ड्रग्स प्रकरण ताजे असतानाच राजकारणातील ड्रग्स प्रकरण समोर आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका युवा महिला कार्यकर्तीला आणि तिच्या साथीदाराला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यावर गाड्यांची तपासणी सुरू असताना संबंधित महिला कार्यकर्त्याच्या कारमधून लाखो रुपयांचा अवैध कोकेन पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या युवा कार्यकर्तीला आणि तिच्या एका साथीदाराला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

कोलकात्याच्या नवीन अलीपूर येथून भाजप युवा मोर्चाच्या पर्यवेक्षक आणि हुगली जिल्ह्याच्या महासचिव पामेला गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून लाखो रुपयांचा अवैध कोकीन जप्त केले आहे. यावेळी पोलिसांनी पामेला गोस्वामी यांच्या प्रबीर कुमार डे या साथीदारालाही अलीपूर परिसरातील एनआर एव्हेन्यु येथून अटक केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

भाजपची युवा कार्यकर्तीला नशेच्या आहारी गेल्याची माहिती पोलिसांना अगोदर पासूनच होती. पोलिसांनी रस्त्यावर तपासणी सुरू असताना पामेला यांची कार थांबवली. यावेळी त्यांच्या कारची आणि बॅगची झडती घेतली असता. पोलिसांना 100 ग्रॅम अवैध कोकेन मिळाले. या कोकेनची बाजारात लाखो रुपये किंमत आहे. यावेळी तिच्यासोबत केंद्रीय सुरक्षा दलातील एक जवानही होता. या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का? यासाठी सखोल तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.