स्वातंत्र्यानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच दिली जाणार एका महिलेला फाशी


मथुरा – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला तिच्या गुन्हेगारी कृत्यांसाठी फाशी देण्यात येणार आहे. मथुरा कारागृहातही यासाठी तयारी सुरू झाली आहे. फाशीची शिक्षा अमरोहा येथे राहणारी शबनम यांना देण्यात येणार आहे. जेव्हा 2008 एप्रिलमध्ये उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथे राहणाऱ्या शबनम नावाच्या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिच्याच कुटुंबातील सात सदस्यांची कुऱ्हाडीच्या सहाय्याने निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने महिलेची फाशीची शिक्षा कायम ठेवली.

यानंतर राष्ट्रपतींकडे शबनम यांनी दया मागितली होती. परंतु, राष्ट्रपतींनी शबनमची दया याचिका फेटाळल्यामुळे शबनम स्वतंत्र भारताच्या इतिहासात फाशी देणारी पहिली महिला असणार आहे. जल्हाद पवन यांनी शबनमला फाशी देण्यासाठी दोनदा फाशीघराची पाहणी केली आहे.

बिहारमधील बक्सरमधून शबनम यांना फाशी देण्यासाठी दोरी मागवण्यात आली आहे. 150 वर्षापूर्वी मथुरामध्ये महिलांना फाशी देण्यासाठी फाशीघर बांधण्यात आले होते. पण अद्याप तेथे कोणालाही फाशी देण्यात आलेली नाही. शबनमला फाशी देण्याबाबत मथुरा जेलचे अधीक्षक शैलेंद्रकुमार मैत्रेय म्हणाले की, शबनमच्या फाशीची तारीख निश्चित झालेली नाही. तसेच याबाबत कोणताही आदेश आलेला नाही. परंतु, जेल प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मृत्यूचे वॉरंट निघताच शबनमला फाशी देण्यात येईल.