मुंबई – भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या महिलांच्या हेतूविषयी शंका उपस्थित करणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना फटकारले आहे. लिव्ह इन म्हणजे फक्त सोबत राहणे, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही. हे अबू आझमींना माहित नसेल. नवऱ्याविरोधात लग्नाची बायकोही बलात्काराची तक्रार करू शकते. स्वतःला बायकोचे मालक समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
अबू आझमी यांच्या लिव्ह इन रिलेशनशीपच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चित्रा वाघ यांनी फटकारले
लिव्ह इन …म्हणजे सोबत राहणं फक्त…तो शरीरसंबंधांचा परवाना नाही
अबू आझमीना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते
स्वतःला बायकोचे *मालक* समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार ? pic.twitter.com/mWZumninMZ
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 17, 2021
चुकीचा कायदाच देशात आहे. कुठलीही स्त्री कायद्यानुसार लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. लिव्ह इन रिलेशन. व्हॉट इज धीस लिव्ह इन रिलेशनशीप? तर तुम्ही एका महिलेला पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता, कुठलाही गुन्हा नाही, वर्षभर एकत्र राहिले आणि नंतर सांगितले माझा बलात्कार झाला, अशा शब्दात अबू आझमी यांनी संताप व्यक्त केला होता.