राज्यपालांकडून कोणत्याही असंवैधानिक कृत्याचे उल्लंघन नाही; देवेंद्र फडणवीस


मुंबई – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना गेल्या आठवड्यात राज्य सरकारने विमान नाकारल्यावरून राज्यातील राजकारण तापले होते. शिवसेना विरोधात भाजपा असे द्वंद्व रंगले होते. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आता शिवसेना आणि सरकारवर टीका केली आहे.

उत्तराखंडला एका कार्यक्रमासाठी राज्यपाल कोश्य़ारी यांना जायचे होते. ते यासाठी सकाळी विमानात देखील जाऊन बसले पण त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून विमानातून नेण्यास परवानगी नसल्याचे सांगण्यात आल्याने विमानातून त्यांना उतरावे लागले. नंतर खासगी विमानाने ते उत्तराखंडला पोहोचले. यावर शिवसेनेने खासगी कार्यक्रमांना सरकारी विमान कसे मिळेल, असे कारण देत भाजपच्या आरोपांना उत्तर देण्यात आले होते. फडणवीस यांनी यावर आता राज्यपालांची बाजू मांडली आहे.

कोणतेही असंवैधनिक कृत्य राज्यपालांनी केलेले नाही. स्वत:च्या मालकीचे सर्वकाही असल्यासारखे राज्याचे सरकार वागत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. आज सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संगीत क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेचा गौरव करणारा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा पार पडत आहे. ख्यातनाम गायक, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा या सोहळ्यात सूर ज्योत्स्ना सरस्वती पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे; तसेच उदयोन्मुख गायक-गायिका प्रथमेश लघाटे आणि हरगून कौर यांचा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.