पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांची केली जाईल नियमानुसार चौकशी – अनिल देशमुख


मुंबई: अरूण राठोड या तरूणाचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात प्रखरतेने समोर येत आहे. सोशल मीडियात पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, यात शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबत असलेल्या कथित प्रेमसंबंधावरून पूजाने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे, यासाठी पुरावा म्हणून देण्यात येत असलेला ऑडिओ क्लिपमधील तो आवाज कोणाचा आहे याचा तपास सुरू आहे.

आता पूजा चव्हाण प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील भाष्य केले आहे. भाजपकडून संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी होत आहे. पण नियमानुसार संजय राठोड यांची चौकशी केली जाईल. राज्य सरकार चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेईल, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच पोलिसांवर दबाव असलेला विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. त्यात काहीच तथ्य नाही. पोलीस चांगला तपास करत आहेत.