मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाने काढले डोके वर


मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. मुंबईतील कोरोनाबाधित नवीन रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या 500 पेक्षा कमी होती, आता कोरोना रूग्णांची संख्या 500 पेक्षा जास्त झाली आहे. मुंबई शहरात रविवारी 645 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 314076 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आजवर एकूण 11419 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील रुग्णालयात सध्या 5068 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबई मंडळात 1141 नवीन रुग्णांची पुष्टी झाली आहे. तर 13 लोकांच्या मृत्यू झाला आहे. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 704561 झाली आहे. आतापर्यंत 19685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई मंडळात मुंबई शहर आणि त्याच्या उपनगराचा समावेश आहे.

रविवारी राज्यात 4,092 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर कोरोनामुळे 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर 1355 कोरोनाबाधित रुग्णांनी मात केली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात कोरोना संक्रमणाची एकूण संख्या 20,64,278 वर गेली आहे, तर मृतांचा आकडा 51,529 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 19,75,603 झाली आहे. राज्यात 35,965 रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.