आता मोबाईल वापरणेही होणार महाग


नवी दिल्ली : आगामी काही काळात फोनवर बोलणे आणि इंटरनेट डेटा भारतीय ग्राहकांना महाग पडू शकतो. कारण फोनवर बोलण्यासाठी आणि इंटरनेटच्या वापरासाठी अधिकची रक्कम भरावी लागू शकते. लंवकरच टेलिकॉम कंपन्या मोबाईल डेटाचे दर वाढवण्याची घोषणा करू शकतात. इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन फर्मनुसार, 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाडर्स आपली रेवेन्यू ग्रोथ वाढवण्यासाठी कंपन्या हे पाऊल उचलू शकतात. गेल्या वर्षात याआधीही टेलिकॉम कंपन्यांनी टेरिफमध्ये वाढ केली होती.

इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन फर्मच्या रिपोर्टनुसार, टेरिफमध्ये वाढ आणि ग्राहकांना 2G ते 4G मध्ये अपग्रेडेशन केल्यामुळे सरासरी रेवेन्यू सुधारू शकतो. आयसीआरएने आपल्या आउटलुक रिपोर्टमध्ये सांगितले की, सेक्टर इनफ्लेशन पॉईंटकडे वाढत आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन वर्षात इंडस्ट्रीचा रेवेन्यू 11 ते 13 टक्के आणि आर्थिक वर्ष 2022 मध्ये ऑपरेटिंग मार्जिन जवळपास 38 टक्के वाढू शकतो.

याबाबत आयसीआरएने दिलेल्या माहितीनुसार, कॅशफ्लो जेनरेशनमध्ये सुधारणा आणि भांडवली खर्चात कपातीमुळे नियमित ऑपरेशनसाठी बाहेरील कर्जाची आवश्यकता कमी होईल. तसेच एडजस्टेड ग्रॉस रेवेन्यूव्यतिरिक्त कर्ज आणि स्पेक्ट्रम लिलावाच्या पुढील फेरीमुळे टेलिकॉम कंपन्यांवर दबाव वाढेल. यात 5G ची मोठी भूमिका असणार आहे. दरम्यान अधिकतर इंडस्ट्रीवर कोरोना काळात वाईट परिणाम झाला आहे. पण याचा अधिक परिणाम टेलिकॉम कंपनीवर झाला नाही. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन स्कूल, कंटेंट वॉचिंग ऍडमुळे डेटा युज वाढला आहे.