उद्या देशातील पहिला CNG ट्रॅक्टर लाँच करणार नितीन गडकरी !


नवी दिल्ली : शेतकर्‍यांना आता पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून मोठा दिलासा मिळणार आहे. स्कूटर, कार आणि बसेसनंतर आता रस्त्यावर आणि शेतात सीएनजी बसविण्यात आलेले ट्रॅक्टरही फिरताना दिसणार आहेत.

उद्या संध्याकाळी पाच वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी देशातील पहिला सीएनजी फिटेड ट्रॅक्टर लॉन्च करणार आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रस्ते वाहतूक व महामार्ग राज्यमंत्री व्ही.के. सिंह आणि राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यावेळी उपस्थित राहणार आहेत.

शेतकऱ्यांना रावमेट टेक्नो सोल्यूशन्स आणि टोमॅसेटो अचिली इंडियाद्वारे सीएनजी बसविण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा फायदा होईल. आता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही सीएनजी ट्रॅक्टर आल्यामुळे मदत होईल, अशी अपेक्षा आहे. सीएनजी एक स्वच्छ इंधन असल्यामुळे कार्बन आणि इतर प्रदूषित कण फार कमी उत्सर्जित होतात. पारंपारिक ट्रॅक्टरपेक्षा नवीन तंत्रज्ञानाद्वारे रूपांतरित सीएनजी इंजिनचे आयुष्य जास्त असेल. सीएनजी ट्रॅक्टरचे मायलेज डिझेलच्या तुलनेत खूप जास्त असेल. एवढेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज चढ-उतार होत असतात, या तुलनेत सीएनजीच्या चढ-उतारांच्या किंमती खूप कमी असतात.

सीएनजी पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा खूप स्वस्त आहे. सीएनजी टँक टाइटपासून सील असल्यामुळे रिफ्यूलिंगच्यावेळी स्फोट होण्याचे प्रमाण कमी असते. वेस्ट टू वेल्थ म्हणजेच कचऱ्यापासून मौल्यवान वस्तू बनविण्याच्या पर्यायाला पुढे आणखी बळकटी मिळते. बायो सीएनजी तयार करण्यासाठी पेंढ्यांचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे केवळ शेतकऱ्यांचे उत्पन्नच वाढत नाही तर पेंढ्या जाळल्यामुळे होणारे प्रदूषण कमी होण्यासही मदत होईल.

काही स्डटीनुसार, सीएनजी ट्रॅक्टर्संना डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरांच्या तुलनेत जास्त पॉवर मिळते. डिझेलच्या तुलनेत सीएनजीपासून 70 टक्के कमी उत्सर्जन होते. शेतकऱ्यांचा इंधन खर्च सीएनजी ट्रॅक्टर वापरल्याने 50 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल. समजा, राजधानी दिल्लीत डिझेलची किंमत प्रतिलिटर 78.03 रुपये आहे, तर सीएनजी 42.70 रुपये प्रति किलो आहे.