नरेंद्र मोदींची सभागृहात सुप्रिया सुळेंसमक्ष शरद पवारांवर टीका


नवी दिल्ली – पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कृषी कायद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाण साधला आहे. २००५ मध्ये एपीएमसी कायद्यात बदल करण्यासंबधी शरद पवारांनी केलेले वक्तव्य वाचून दाखवत नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली आहे. नरेंद्र मोदी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलत होते. सुप्रिया सुळे यावेळी सभागृहात उपस्थित होत्या.

एपीएमसी कायदा बदलला असल्याचे गर्वाने कोण सांगत होते, कोण २४ असे बाजार उपलब्ध झाल्याचे सांगत होते…तर मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील कृषीमंत्री शरद पवार असे सांगत होते बोलत होते. आज अचानक शरद पवार उलट बोलत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी हा रस्ता का निवडला असल्याची शंका येते, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे.

यावेळी शरद पवारांचे अजून एक उत्तर वाचून दाखवत नरेंद्र मोदी म्हणाले की, एपीएमसीमध्ये शेतकऱ्यांच्या बचावासाठीच बदल केले जात आहेत. मंडईचा पर्याय शेतकऱ्यांना मिळावा. जास्त व्यापारी नोंद झाल्यास स्पर्धा वाढेल आणि मंडईमधील जाळे संपेल, असे त्यांनी सांगितले होते. त्याचबरोबर कृषी कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न अनेक सरकारांनी केल्याचेही त्यांनी सांगितले. भोजपुरीत एक गोष्ट आहे की, ना खेळणार, ना खेळून देणार असे सांगत नरेंद्र मोदींनी विरोधकांना टोला लगावला.