हेराफेरी करून पद मिळाल्यावर असे होते; निलेश राणेंचा अजित पवारांना टोला


मुंबई – पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. देशात मोगलाई आहे का? निलेश राणेंनी या अजित पवारांच्या सवालावरुन टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात मोगलाई आहे का? असे अजित पवारांना म्हणायचे होते, ते चुकून देशात म्हणाले, हेराफेरी करुन पद मिळाल्यावर असे होते, असे म्हणत निलेश राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. तसेच याला चिंधी विचार म्हणतात साहेब, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला, असे म्हणत सणसणीत टोला लगावला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. तसेच पुन्हा अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र सरकार असे अजित पवारांना म्हणायचे होते पण चुकून देशात म्हणाले… हेराफेरी करून पद मिळाल्यावर असे होते. मी परवा भाषणात कुठेतरी अनेक वेळा आमदार झालो पण जॅकेट घातले नाही, म्हणाले, याला चिंधी विचार म्हणतात साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रमध्ये अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. पण तरीसुद्धा महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावे लागेल, असे निलेश राणे म्हणाले. अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला होता. कोणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात काय करावे हा त्यांचा विषय आहे. पण जर आरोप झाले आहेत तर पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे. तसेच दुसरे, माहिती लपवणे निवडणूक आयोगानुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली होती.