राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण


कोल्हापूर – राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त असून पाटील यांनी स्वतःच थोड्यावेळापूर्वी ट्विटरद्वारे कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली असून आपली प्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन, असे ट्विट पाटील यांनी केले आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. शुक्रवारी त्यांनीही स्वतःच ट्विटरद्वारे माहिती दिली होती. देशमुख यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.