तृतीयपंथीय तक्रार निवारण समितीवर सदस्य नियुक्तीकरिता संपर्क साधण्याचे आवाहन


मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्यांचे व तक्रारींचे जलद गतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तृतीयपंथीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींची सदस्य म्हणून नियुक्ती करावयाची असून संबंधित इच्छुकांना संपर्क साधण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या सहायक आयुक्तांनी पत्रकाद्वारे केले आहे.

जिल्हास्तरीय समिती गठित करत असताना समितीमध्ये सदस्यांची नेमणूक करण्यासाठी, तृतीयपंथीयासाठी कार्य करणाऱ्या नामवंत संस्थांतील 2 तृतीयपंथीय व्यक्ती (त्या पैकी किमान एक व्यक्ती Transwoman असणे आवश्यक) यांची नेमणूक करावयाची आहे. तसेच जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मान्यतेने सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी एक व्यक्ती समितीवर नियुक्त करावयाची आहे. तरी मुंबई उपनगर जिल्ह्यातील संबंधित संस्था व व्यक्तींनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, नवीन प्रशासकीय इमारत, 4था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई – 400 071, या पत्त्यावर किंवा दूरध्वनी क्र. 022 25222023 अथवा Email:[email protected] येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.