शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मिया खलिफाने पुन्हा शेअर केला व्हिडीओ


भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला काही दिवसांपूर्वीच माजी पॉर्न स्टार मिया खलिफाने पाठिंबा दिल्यानंतर अनेक भारतीय सेलिब्रिटिंनी आमच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप नको, अशा शब्दात तिला सुनावले होते. त्यावर आता मिया खलिफानेही पुन्हा उत्तर दिले आहे.

आपल्या ट्विटर हँडलवरुन मिया खलिफाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ती यामध्ये समोसा, गुलाबजाम असे भारतीय पदार्थ खाताना दिसत असून टोमणा मारण्याच्या अंदाजात प्रत्येक गोष्टीची काहीतरी किंमत असते, असे ती या व्हिडीओत म्हणत आहे. बरीच मेहनत केल्यानंतर त्याचा मोबदला भेटल्यावर खूप चांगले वाटते. मी देखील आज हे स्वादिष्ट जेवण कमावले आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या एका मोहिमेमुळे हे स्वादिष्ट जेवण माणुसकीच्या नात्याने मला मिळाले.


मला माझ्या कामासाठी समोसा आणि अन्य सर्व पदार्थ मिळाले आहेत, असे मिया खलिफा या व्हिडिओत बोलत आहे. सोबतच, खाताना टोमणा मारण्याच्या अंदाजात प्रत्येक गोष्टीची काहीतरी किंमत असल्याचेही ती म्हणते. याशिवाय स्पेशल थाळी पाठवणाऱ्यांचे मिया खलिफाने आभार मानले आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांचाही उल्लेख केला. मिया खलिफाने व्हिडिओ शेअर करताना, या स्वादिष्ट जेवणासाठी रुपी कौर यांचे आभार आणि गुलाबजाम पाठवणाऱ्या जगमीत सिंह यांचेही धन्यवाद. जेवण झाल्यावर स्वीट खाण्यासाठी माझ्या पोटात जागा शिल्लक राहत नसल्यामुळे जेवतानाच मी गोड पदार्थ खात आहे. असे म्हणतात की, दिवसात एक गुलाब कट्टरतावादाला दूर ठेवतो, असे देखील तिने म्हटले आहे. तिने या ट्विटसोबत #FarmersProtests हा हॅशटॅगही वापरला आहे. सोशल मीडियावर मिया खलिफाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. युजर्सही तिच्या या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया देत आहेत.