दुबईतील या हॉटेलमध्ये बेरोजगाराना सन्मानाने मिळते जेवण

kabab-shoop
जगात अनेक दानशूर व्यक्ती आहेत मात्र अन्नदानाचे पुण्य सर्वात मोठे मानले जाते. भुकेल्या जीवाला सन्मानाने दिलेले दोन घास सर्व दानापेक्षा मोठे ठरतात. दुबईतील सिलिकॉन ओअॅसीस मध्ये असलेल्या द कबाब शॉप या हॉटेलचे मालक कमाल रिझवी हे कॅनेडियन पाकिस्तानी गृहस्थ बेरोजगार लोकाना मोफत जेवायला घालतात आणि तेही अतिशय सन्मानाने. या हॉटेल बाहेर कमाल यांनी बोर्ड लावला आहे. त्यावर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर येथे पोटभर खाऊ शकता, पैशाची काळजी नको असे लिहिले आहे.

या हॉटेलात बेरोजगार व्यक्ती पैसे न देता कसे खायचे याचा विचार करत नाही कारण कमाल सांगतात मी त्यांना अगोदरच स्पष्ट सांगतो, पैशाची चिंता नको, मी तुमच्यावर उपकार करत नाही. नोकरी मिळेपर्यंत पोटभर ख, नोकरी मिळाली कि माझे पैसे आणून द्या. माझी हि एकप्रकारची समाजसेवा आहे. त्यातून मला खूप आनंद मिळतो.

याची सुरवात कशी झाली ते सांगताना कमाल म्हणाले, नेहमी येणारा एक तरुण काही दिवसांनी आमच्याकडे येईना झाला तेव्ह्या त्याच्या मित्रांना मी कारण विचारले तेव्हा त्यांनी त्याची नोकरी सुटल्याचे व जेवणाचे बिल देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले. तेव्हा मी त्या मित्राला घेऊन या अशी विनंती केली आणि त्याला नोकरी लागल्यावर बिल दे आत्ता पोटभर जेव असे सांगितले आणि या उपक्रमाची सुरवात झाली.

कमाल सांगतात बेरोजगार येथे येतात तेव्हा आम्ही त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे मागत नाही तसेच त्यांच्या बिलाची कोणतीही नोंद ठेवत नाही. सर्वसामान्य ग्राहकांप्रमाणे त्यांना हवे ते खायला दिले जाते. हे लोक अनेकदा पेपर नॅपकिन वर धन्यवाद असे लिहून जातात. अनुभव असा आहे, कि यातील बरेच लोक नोकरी लागली कि पैसे आणून देतात. आम्ही कधीही त्यांना बिलाची आठवण न करून देताही

Leave a Comment