वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आजमावा कॅबेज सूप

cabbage
वजन घटविण्यासाठी अनेक जण अनेक तऱ्हेची डायट, किंवा काही ठराविक रेसिपीज स्वीकारीत असतात. पण एखादी रेसिपी वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी खाल्ली जात असतात, त्यामध्ये भूक लाकर शमते आहे किंवा नाही, त्यामध्ये अतिरिक्त कॅलरीज तर नाहीत, आणि त्याचबरोबर शरीराच्या पोषणाला आवश्यक अशी सर्व तत्वे आहेत किंवा नाहीत हे पाहणे अगत्याचे ठरते. अश्या वेळी कोबीचे सूप, किंवा कॅबेज सूप या पदार्थाचे सेवन इच्छुकांना करता येऊ शकते. हे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक आहे, याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सूप जास्त मात्रेमध्ये करून फ्रीजमध्ये ठेवता येते. त्यामुळे ज्यांना स्वयंपाकासाठी फारसा वेळ मिळत नाही, त्यांच्याकरिता हे सूप उत्तम पर्याय ठरते.
cabbage1
कोबी ही ‘निगेटिव्ह कॅलरीज’ असणारी भाजी आहे, म्हणजेच ही भाजी पचविण्यास जास्त कॅलरीज खर्च होत असतात. कोबीच्या सूपमध्ये कोबीच्या जोडीने इतरही भाज्यांचा समावेश करायचा असल्याने शरीराला आवश्यक ती सर्व पोषक तत्वे या सूपच्या माध्यमातून मिळत असतात. या सूपच्या जोडीने आपण घेत असलेला इतर आहारही कमी कॅलरीज युक्त असेल, तर वजन नियंत्रित ठेवण्यास ते देखील सहायक ठरते. उदाहरणार्थ साखरेचा कमीत कमी वापर, मैदा आणि इतर रिफाइंड आणि प्रोसेस्ड अन्नपदार्थ टाळणे, इत्यादी बदल आहारामध्ये करून त्याला पूरक म्हणून अधून मधून ही कोबीचे सूपही आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावे.
cabbage2
हे सूप बनविण्यास्ठी कोबीच्या सोबत गाजरे, सेलेरी, मश्रुम्स, टोमाटो, पालक इत्यादी भाज्यांचा किंवा जे मांसाहारी असतील त्यांनी चिकनचा वापर करावा. हे सर्व पदार्थ पाण्यामध्ये चांगले शिजवून घेत सूप तयार करावे. मांसाहारी लोकांना सूप बनविण्यासाठी इतर भाज्यांच्या बरोबर चिकन स्टॉकचा वापर करता येईल. शाकाहारी व्यक्तींनी सूप बनविण्याकरिता भाज्यांचा स्टॉक वापरावा, हा स्टॉक तयार करण्यासाठी भाज्यांची देठे, साले स्वच्छ धुवून घेऊन पाण्यामध्ये पाणी थोडे आटेपर्यंत शिजवावीत. हे कोबीचे सूप तयार करून फ्रीजमध्ये ठेवावे आणि जसे लागेल त्याप्रमाणे याचे सेवन करावे. फ्रीजमध्ये तीन ते चार दिवसांपर्यंत हे सूप ठेवता येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment