यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने केले भारताचे कौतुक


नवी दिल्ली – कोरोना संसर्गाच्या प्रमाणात भारतात घट झाल्यामुळे तसेच या महामारीच्या काळात केलेल्या प्रयत्नांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. कोरोनावर भारताने नियंत्रण मिळवण्यात चांगली कामगिरी करुन दाखवल्याचे संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेड्रॉस ए. गेबरेसस यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या विषाणूवर आपण या सोप्या सार्वजनिक आरोग्याच्या उपाययोजना केल्यास सहज मात करु शकतो, भारताच्या कामगिरीवरुन हे आपल्याला दिसते. या प्रयत्नांमध्ये लसही समाविष्ट झाल्याने आता अधिक चांगले परिणाम घडून येतील अशी आपण आशा करतो, असेही आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने शुक्रवारी लोकसभेत सांगितले की, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात घटत असल्याचे दिसते आहे. दररोजच्या आकडेवारीत घट होत आहे, जी सप्टेंबर २०२०च्या मध्यावर सर्वात उच्च पातळीवर पोहोचली होती.