हाडांना मार लागल्यास…

bone
एखाद्या प्रसंगी हाताला किंवा पायाला किंवा शरीराला कुठेही मार लागल्यानंतर सर्वप्रथम हाड तर मोडले नसेल ना, अशी शंका प्रत्येकाच्याच मनामध्ये डोकावते. अश्या वेळी हात पाय हलवून पाहण्याचा सल्ला दिला जातो, कारण जर हाड मोडले असले, तर हात किंवा पाय हलविणे केवळ अशक्य होऊन बसते. जर मार लागल्यानंतर त्वरित सूज आली आणि मार लागलेल्या अवयाचाची हालचाल करणे अशक्य झाले, तर हाड मोडले असण्याची शक्यता असते. मार लागताना हाड चटकण्याचा आवाज येणे, मार लागलेली जागा त्वरित सुजणे हे हाड मोडले असण्याचे संकेत आहेत.
bone1
हाड मोडल्यानंतर वेदना होणे जरी स्वाभाविक असले, तरी अनेकदा लहान मोठ्या अपघातांमध्ये जर हाडामध्ये हेअर लाईन क्रॅक आली असली, तर त्यामुळे वेदना होईलच असे नाही. अनेकदा तर हेअर लाईन क्रॅक आहे, हे व्यक्तीला समजतही नाही. पण काही दिवसांनंतर अचानक होऊ लागलेल्या वेदेनेचे निदान करताना हेअर लाईन फ्रॅक्चर असल्याचा उलगडा झाल्याच्या अनेक केसेस पहावयास मिळतात.
bone2
वयस्क लोकांच्या शरीरामध्ये कॅल्शियमची मात्रा आणि हाडांचे घनत्व कमी होऊन हाडे ठिसूळ झाल्याने, ती अगदी लहानशा धक्क्याने मोडण्याचा धोका अधिक असतो. अनेकदा हाडांना मार लागल्यानंतर डॉक्टरांकडे जाणे टाळले जाते. पण असे केल्यास हाड वेडेवाकडे जुळून येण्याचा संभव अधिक असतो. त्यामुळे हाडांना थोडा जरी मार लागला असला, तरी त्याबद्दल डॉक्टरांकडून सल्ला घेणे अगत्याचे ठरते. अनकेदा हाडांवर प्लास्टर चढविण्याची देखील आवश्यकता नसते, तर केवळ अवयवाला पुरेसा आराम दिल्यानेच लहान फ्रॅक्चर दुरुस्त होतात. पण या बद्दलचा निर्णय स्वतः न घेता डॉक्टरांचा सल्ला मानणे जास्त उपयोगी ठरते.
bone3
तुटलेले हाड जुळून आल्यानंतर आधीपेक्षा जास्त मजबूत होते अशीकाहींची समजूत असते, यामध्ये मात्र अजुबत तथ्य नाही. तुटून पुन्हा जुळलेले हाड मजबूत असते, पण हे हाड जुळण्यापूर्वी जसे होते त्यापेक्षा कमी किंवा अधिक मजबूत असत नाही. ते तितकेच बळकट असते, जितके तुटण्यापूर्वी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment