उत्तम आरोग्यासाठी दररोज करा नारळाच्या पाण्याचे सेवन

coconut
आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभकारी अश्या अनेक अन्नपदार्थांचे सेवन आपण नेमाने करीत असतो. यातील अनेक पदार्थ संपूर्ण नैसर्गिक असतात, तर काही कृत्रिम रित्या तयार केले जातात. यामध्येच एक पेय असे आहे, जे संपूर्णपणे निसर्गदत्त आहे, चविष्ट आहे, आणि आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे आहे. याच्या सेवनाने शरीरामध्ये चैतन्य निर्माण होते, थकवा दूर होतो आणि शारीरतील पाण्याची कमतरता दूर होते. त्यामुळे इतर पेयांच्या जोडीनेच नारळाच्या पाण्याचा समावेश आपल्या दैनंदिन आहारामध्ये अवश्य करावा.
coconut1
नारळाच्या पाण्यामध्ये असलेले डायटरी फायबर अन्न पचण्यास मदत करते, या फायबर मुळे भूक शमण्यास मदत मिळून त्यामुळे वारंवार खाण्याची इच्छा नाहीशी होते, परिणामी वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामध्ये मॅग्नेशियम मुबलक मात्रेमध्ये असून, याच्या सेवनाने मायग्रेनमुळे उद्भविणारी डोकेदुखी निवळण्यास मदत होते. नारळाच्या पाण्यामध्ये क जीवनसत्व आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे त्याच्या सेवनाने उच्चरक्तदाब नियंत्रणात राहतो.

नारळाच्या पाण्याच्या नियमित सेवनाने किडनी स्टोन होण्याचा धोका पुष्कळ अंशी कमी होतो. त्वचेच्या काही विकारांवर देखील नारळाचे पाणी अतिशय गुणकारी आहे. नारळाच्या पाण्याच्या नियमित सेवनाने चेहऱ्यावरील मुरुमे, पुटकुळ्या दूर होण्यास मदत होते. तसेच ज्यांना एक्झिमा किंवा तत्सम त्वचेचे विकार असतील, त्यांनी देखील आपल्या दैनंदिन आहारामध्ये नारळाच्या पाण्याचा समावेश जरूर करावा. ज्या लोकांना नियमित मद्यपान करण्याची सवय असले, त्यांनी नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने मद्यामुळे आलेला ‘हँग ओव्हर’ दूर होण्यास मदत होते, तसेच शरीरामध्ये झालेले डीहायड्रेशन दूर होण्यासही मदत होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment