राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह


मुंबई – कोरोनाचा संसर्ग राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना झाला असल्याची माहिती स्वतः त्यांनी ट्विट करून दिली आहे. शिवाय आपल्या संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल. असे अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


दरम्यान, यापूर्वीच देशातील १० वर्षे अथवा त्याहून अधिक वयोगटातील २१ टक्क्यांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे, असे आयसीएमआरने अलीकडेच केलेल्या सीरो सर्वेक्षणात म्हटल्याचे गुरुवारी सरकारने जाहीर केले. त्याचप्रमाणे कोरोनाची सहज लागण होण्याचे प्रमाणही मोठे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.