भारताच्या नवीन कृषी कायद्यांचे अमेरिकेने केले स्वागत


वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींकडून भारतातील शेतकरी आंदोनलनाला पाठिंबा मिळत असताना आता यावर अमेरिकेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या नवीन कृषी कायद्यांचे अमेरिकेने स्वागत केले आहे. जगभातील बाजारावर नव्या कृषी कायद्यामुळे प्रभाव वाढेल. अशा प्रकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असे अमेरिकेने म्हटले आहे. शेती कायद्यास शांततापूर्ण विरोध हा भरभराट होणाऱ्या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. एखाद्या कायद्याबद्दल मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करता येऊ शकतात. त्याचबरोबर भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्यांचे स्वागत असल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे.

परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, कृषी क्षेत्रात सुधारणा करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या निर्णयाचे बायडेन सरकार समर्थन करते. खासगी गुंतवणुकीस नवीन कृषी कायदे आकर्षित करतात आणि शेतकर्‍यांसाठी अधिकाधिक बाजारपेठांना आकर्षित करु शकतात. भारताच्या बाजाराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आकर्षित करणाऱ्या निर्णयाचे अमेरिकेने स्वागत केल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने भारतातील शेतकर्‍यांच्या आंदोलनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे की, भारतातील पक्षांतर्गत मतभेदांचे निराकरण करण्याच्या बाजूने अमेरिका आहे. शांततेत निषेध करणे ही कोणत्याही लोकशाहीच्या भरभराटीची वैशिष्ट्य आहे आणि भारतीय सर्वोच्च न्यायालयानेही, असे म्हटले आहे.

एकीकडे भारत सरकारला अमेरिकेतील नवीन बायडेन सरकार पाठिंबा देताना दिसत आहे, तर अनेक अमेरिकन भारतातील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. अमेरिकन कॉंग्रेसचे हेली स्टीव्हन्स म्हणाल्या की, नवीन कृषी कायद्यांविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणार्‍यांविरूद्ध कारवाई केल्याबद्दल मला काळजी वाटते. याखेरीज इतरही नेते शेतकरी आंदोलकांच्या बाजूने दिसले.