धनंजय मुंडेंविरोधात दुसऱ्या पत्नीची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार


मुंबई : काही दिवसापूर्वीच एक महिलेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. पण त्यानंतर तक्रारदार तरुणीने आपली तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत मुंडे यांनी गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. यात १४ वर्षाची मुलीचाही समावेश असून, ती देखील सुरक्षित नसल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी याप्रकरणी आपल्यास सहकार्य केले नाहीतर आपण २० फेब्रूवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आज मेरा जन्मदिन हे पर मेरे पती ने 3 महीने से मेरे बच्चे छुपा के उसके बंगले चित्रकूटपे रखे हे मुझे मिलने ओर बात करने भी नहि दे रहा हे राजनीति की पावर का दूर उपयोग
इतना अत्याचार तो रावण ने भी नहि किया होगा

Posted by Karuna Dhananjay Munde on Monday, 1 February 2021

पोलीस आयुक्ताकडे करुणा यांनी दिलेल्या अर्जामध्ये गेल्या तीन महिन्यापासून माझे पती धनंजय मुंडे यांनी दोन मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्यात लपून ठेवले आहे. त्यांच्याशी मला भेटू देत नाही. २४ जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बँगल्यावर जाताच, मुंडे यांनी ३० ते ४० पोलिसांना बोलावून मला हकलून लावले. बंगल्यावर माझी मुले सुरक्षित नाही. त्यात १४ वर्षाच्या मुलीचाही समावेश असून महिला केअरटेकरही नाही. मुंडे त्यांच्यासमोर अश्लील वर्तन करतात. माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला मुंडे जबाबदार असणार आहेत. माझ्या मुलांसोबत जर माझी भेट घालून दिली नाही तर २० फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे चित्रकूट बंगल्यासमोर किंवा मंत्रालय आणि आजाद मैदान येथे उपोषणासाठी परवानगी दया आणि मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.