तुम्ही पाहिला आहे का आकाश ठोसर या वेबसिरीजमधील डॅशिंग लुक


अभिनेता आकाश ठोसरला ‘सैराट’ चित्रपटामुळे कमालीची प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर आता आगामी वॉर-एपिक सिरीज ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स’मध्‍ये आकाश प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभय देओल व सुमीत व्‍यास यांच्‍यासह इतर प्रतिष्ठित कलाकार देखील महेश मांजरेकर दिग्‍दर्शित या वेबसिरीजमध्‍ये दिसणार आहेत. लवकरच या कलाकारांची नावे सांगण्‍यात येतील. ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स’ हॉटस्‍टार स्‍पेशल्‍स सिरीज वास्‍तविक घटनांमधून प्रेरित आहे. शौर्य व पराक्रमाची ऐकण्‍यात न आलेली कथा सादर करण्‍यासोबत कशाप्रकारे १२५ भारतीय सैनिक ३००० चीनी सैनिकांविरूद्ध लढले, ही सिरीज त्‍या कथेला देखील दाखवते.


नुकतेच शूरवीरांपैकी एकाच्‍या भूमिकेत झळकणाऱ्या आकाश ठोसरने सांगितले की, लष्‍करामध्‍ये त्‍याचे जाण्‍याचे बालपणापासून स्‍वप्‍न होते. तो पुढे म्‍हणाला, माझ्यासाठी सिरीज ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स’ स्‍वप्‍नवत प्रोजेक्ट आहे. माझे बालपणापासून भारतीय सेनेमध्‍ये जाण्‍याचे स्‍वप्‍न होते आणि मी चित्रपटसृष्‍टीमध्‍ये येण्‍यापूर्वी लष्‍करामध्‍ये निवड होण्‍यासाठी दोनदा परीक्षा देखील दिली होती. फक्‍त सैन्‍य अधिकारीच नव्‍हे तर मी पोलिस सेवेमध्‍ये देखील दाखल होण्‍याचा प्रयत्‍न केला. मी अभिनेता नसतो तर निश्चितच आपल्‍या देशाच्‍या संरक्षणासाठी माझे करिअर सैन्‍यामध्‍ये असते.

मला सैनिकाची भूमिका साकारण्‍याची पहिल्‍यांदाच संधी मिळाल्यामुळे माझी छाती आनंद व अभिमानाने भरून आली. वास्‍तविक जीवनात मला जी संधी मिळाली नाही ती सैन्‍याचा पोशाख परिधान करण्‍याची संधी रील जीवनामध्‍ये मिळाल्‍याने खूप आनंद झाला. मला अत्‍यंत खास वाटले. त्याचबरोबर मी सैन्‍याचाच भाग आहे आणि मी स्‍वत:कडे त्‍याच दृष्टिने पाहिन. आकाश ठोसर किशनची भूमिका साकारणार आहे, जो मेजर सुरज सिंग (अभय देओल) नेतृत्वाखालील बटालियनचा भाग आहे.