केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया


मुंबई – आज देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर केल्यानंतर संपूर्ण देशभरात या अर्थसंकल्पासंदर्भात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून कौतूकाचा केंद्र सरकारच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पावर वर्षाव केला जात आहे. तर, विरोधकांनी याच अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याचपार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच थोडासा अवधी घेऊन या अर्थसंकल्पावर व्यवस्थित बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

नुकताच प्रसार माध्यमांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे अर्थसंकल्पाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर बोलताना म्हणाले की, हा अर्थसंकल्प देशासाठी पाहिजे, निवडणुकांसाठी नको. तसेच हा देशाचा अर्थसंकल्प आहे, निवडणुकांचा नाही. थोडासा अवधी घेऊन मी अर्थसंकल्पावर व्यवस्थित बोलणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. पश्चिम बंगाल, केरळ व दक्षिणेकडील राज्यांसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात मोठ्याप्रमाणावर तरतूद केल्या गेल्याचे दिसत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तत्पूर्वी यावर्षीच्या अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना व त्याआधीही ही रोजगार संपला असताना रोजगार निर्मितीचे काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच विधानसभा निवडणूक असलेल्या राज्यांसाठी हा अर्थसंकल्प असून महाराष्ट्र यात दिसत नाही. कंपन्या व्यतिरिक्त आता जमिनी विकण्याकडेही केंद्र सरकारचा कल असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.