अर्थसंकल्प : या वस्तु झाल्या स्वस्त आणि महाग


नवी दिल्ली – आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष २०२१-२२ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांकडून कोरोना काळात संपूर्ण देशाला मोठ्या घोषणांची अपेक्षा होती. पण देशातील जनतेला अर्थमंत्र्यांनीही निराश केलेले नाही. कोरोनाचं जागतिक संकट असतानाही अनेक गोष्टींवरील आयात कर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे अर्थमंत्री सीतारामन यावेळी म्हणाल्या.

दोन गोष्टी अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय महत्वाच्या ठरतात. एक म्हणजे इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार की नाही? आणि कोणत्या गोष्टी स्वस्त होणार व कोणत्या महागणार? याकडेच संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. यातील पहिल्या गोष्टीत म्हणजेच इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सरकारकडून यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण अनेक महत्वाच्या गोष्टींवरचा आयात कर कमी करुन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.

या वस्तु होणार स्वस्त

  • स्टील आणि लोखंडी वस्तूंच्या किमती कमी होणार
  • सोने आणि चांदीच्या आयात शुल्कात घट, त्यामुळे सोने आणि चांदी आणखी स्वस्त होणार
  • तांब्याच्या वस्तू
  • चामड्यापासून बनवलेल्या वस्तू

या वस्तु होणार महाग

  • मोबाइलच्या काही पार्ट्सवर कर वाढविण्यात आल्याने मोबाइलच्या किंमती होणार वाढ
  • परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुट्या भागांवरील कर वाढविण्यात आल्यामुळे वाहनांच्या किमतीत होणार वाढ
  • परदेशातून आयात केले जाणारे कपडे
  • कॉटनचे कपड्यांच्या किंमतीत होणार वाढ