अर्थसंकल्पः ब्रँडेड पेट्रोल-डिझेल अशा प्रमिअम इंधनावर लागणार कृषि अधिभार (सेस)


नवी दिल्ली – सर्वसामान्यांचे कंबरडे कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीने मोडलेले असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आता मोठी घोषणा केली आहे. कृषि अधिभार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी लावण्यात येणार असून पेट्रोल, डिझेलला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कृषी सेस आकारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 92.86 आणि डिझेल 83.30 रुपयांना लीटर आहे. हा सेस यावर लागणार नसून तो कंपन्यांच्या ब्रँडेड पेट्रोल आणि डिझेलवर लागणार असल्यामुळे कंपन्यांना हा सेस द्यावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर या दरवाढीचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

डिझेलवर 4 रुपये आणि पेट्रोलवर 2.5 रुपयांचा सेस लावण्यात आला आहे. ब्रँडेड पेट्रोल डिझेल म्हणजेच स्पीड, एक्स्ट्रा माईल अशा प्रमिअम इंधनावर हा सेस लागणार आहे. याचा अर्थ सरकारने कृषी क्षेत्रासाठी वेगळा फंड तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.