अर्थसंकल्पः मद्यप्रेमींना निर्मला सीतारामन यांनी दिला झटका


नवी दिल्ली – आज केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. काही क्षेत्रांना या अर्थसंकल्पात मदतीचा हात देण्यात आला आहे, तर काही गोष्टी महाग केल्या आहेत. मद्यप्रेमींना या अर्थसंकल्पाने जोरदार झटका दिला आहे. अर्थसंकल्पात मद्य आणि तत्सम पेय (बिअर इत्यादीं)च्या किंमतीमध्ये मोठी वाढ जाहीर केली आहे. अल्कोहोलयुक्त पेयांवरील सेसच्या दरात आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये तब्बल १०० टक्क्यांनी वाढ करण्यात आल्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मद्य आणि मद्ययुक्त पेय यांच्या किमतीत वाढ होणार आहे.

अर्थसंकल्प सादर करताना काही मोठ्या घोषणा देखील केंद्रीय अर्थमंत्री निर्मली सीतारामन यांनी केल्या. कोरोना संकटामुळे आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोरोना प्रतिबंधक लसीचाही उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय देशात शेतकरी आंदोलनाची चर्चा सुरु असताना सरकारचे शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे उद्दिष्ट असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.