घरामध्ये तणावमुक्त वातावरण टाळण्यासाठी काही खास वास्तू टिप्स

vastu
ज्योतिषशास्त्रामध्ये वास्तूशास्त्राचे विशेष महत्व आहे. तसेच घर बनविताना किंवा तयार घर खरेदी करताना देखील वास्तुशास्त्राचे नियम लक्षात घेऊनच घराची रचना केली जाण्याला प्राधान्य दिले जाते. घराची सजावट करताना किंवा घरामध्ये वस्तू मांडताना देखील वास्तुशास्त्राचे नियम लक्षात घेतले जातात. या सर्व शास्त्रामागचे कारण हे की घरामध्ये वातावरण तणावमुक्त राहवे आणि घरातील उर्जा सदैव सकारात्मक राहावी. जर वातावरण तणावमुक्त आणि उर्जा सकारत्मक असेल तर घरामध्ये राहणाऱ्या आणि येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनस्थितीवर आणि परिणामी आरोग्यावर त्याचे सकारात्मक परिणाम होत असतात. त्यामुळे घरामध्ये वातावरण सकारात्मक आणि तणावमुक्त ठेवायचे असल्यास वास्तूशास्त्राचे काही नियम लक्षात घेणे लाभदायक ठरेल.
vastu1
वास्तूशास्त्रामध्ये ईशान्य दिशेचे विशेष महत्व आहे. ही दिशा अतिशय शुभ समजली जाते. या भागामध्ये शक्यतो कोणत्याही प्रकारचे उंचवटे असू नयेत. या दिशेला कोणत्या प्रकारचे उंचवटे असल्यास घरातील सदस्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता वास्तुशास्त्रामध्ये सांगितली आहे. घरामध्ये अतिरिक्त सामानासाठी साठवणीची जागा किंवा स्टोअर रूम असल्यास, ही जागा उत्तरेला असू नये. उत्तरेला अडगळीचे सामान साठविल्याने घरातील वातवरण तणावपूर्ण असू शकते.
vastu2
वास्तूशास्त्राच्या अनुसार घरातील स्वयंपाकघर किंवा शौचालय घराच्या उत्तर-पूर्व दिशेला नसावे. या वास्तूदोषामुळेही घरातील वातावरण तणावाने भरलेले असण्याची शक्यता असते. तसेच विजेची महत्वाची उपकरणे घराच्या इशान्य दिशेला ठेऊ नयेत. घरातील कचरा साठविण्याची बादली किंवा डस्टबिन घराच्या उत्तर पूर्वी दिशेला असून नये.

Leave a Comment