व्हायरल : महिलेसोबत भाजप नेत्याचा अश्लील डान्स


प्रतापगड – सध्या सोशल मीडियावर राजस्थानमधील प्रतापगडचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. एका समारंभाचा हा व्हिडिओ असून एक भाजप नेता ज्यात एका महिला डान्सरबरोबर अश्लील प्रकारचे नृत्य करताना दिसत आहे. हा व्हिडीओ भाजपच्या त्या विभागाील ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष असलेले कैलास गुर्जर यांचा असून हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुर्जर यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. पण प्रतापगढ नगर परिषदेच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीआधी हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने यावरून वातावरण चांगलेच तापले आहे.

माझ्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी मी गेलो होतो. तिथे हा प्रकार घडला. ते माझे वैयक्तिक आयुष्य असून भाजपशी त्या कार्यक्रमाचा काहीही संबंध नाही. काही लोक मुद्दाम त्या व्हिडीओचा वापर करून माझी प्रतिमा मलीन करत असल्याचे स्पष्टीकरण गुर्जर यांनी दिले आहे. तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपचे राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात असून प्रकरण नक्की काय आहे ते उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.


राजस्थानच्या निंबाहेडा-मांगलोर या ठिकाणी २३ नोव्हेंबरला हा प्रकार घडला. गुर्जर यांनी याबाबत बोलताना सांगितले आहे की मी माझ्या कुटुंबासोबत नृत्य करत होतो. तो आमच्या परिवाराचा एक सांस्कृतिक कार्यक्रम होता. माझा डान्स अनेकांनी रेकॉर्ड केला. या डान्सकडे बहुतांश लोकांनी वाईट नजरेने पाहिले नाही. पण काही लोक मुद्दाम या व्हिडीओचा वापर माझ्याविरोधात करत असल्याचेही त्यांनी सांगितले. पण त्यांच्यावर काँग्रेसकडून आरोप केला जात आहे की गुर्जर बार गर्ल्ससोबत डान्स अश्लील नृत्य करत होते.