न्यूझीलंड देशाबद्दलची काही रोचक तथ्ये

newzeland
निसर्गाचा वरदहस्त लाभलेला, बर्फाच्छादित पर्वतराजीने नटलेला आणि सुंदर सागरी किनारे लाभलेला असा न्यूझीलंड देश, हौशी पर्यटकांच्या पर्यटनस्थळांच्या ‘बकेट लिस्ट’मध्ये अगदी वरच्या क्रमांकावर आहे. या देशाबद्दल काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या. सुमारे सातशे वर्षांपूर्वी न्यूझीलंड मध्ये मानवी वस्ती अजिबात नव्हती. या देशामध्ये मानवी वस्ती १२८० सालच्या सुमारास अस्तित्वात आली. तैवान मधील लोक आधी मेलानेशिया येथे स्थलांतरित झाले, आणि त्यानंतर हे लोक पूर्वेला न्यूझीलंड मध्ये आले. याच लोकांचे वंशज आता न्यूझीलंडमध्ये ‘माओरी’ म्हणून ओळखले जातात.
newzeland1
न्यूझीलंड निवासींना ‘किविज्’ या टोपणनावाने जगभरात ओळखले जात असले, तरी हे किवी हे फळ मूळचे येथील नाही. हे फळ मूळचे चीनमधील आहे. पण किवी नामक उडू न शकणारा पक्षी माओरी जमातीमध्ये महत्वाचे स्थान आहे. २०१३ सालापर्यंत न्यूझीलंडमधील उत्तर आणि दक्षिण द्वीपाला औपचारिक नावेच नव्हती. या द्वीपांना उत्तरी द्वीप आणि दक्षिण द्वीप म्हणूनच संबोधले जात असे. पण जनमत विचारात घेऊन आता या द्वीपांना ‘तेई इका अ माउइ’ आणि ‘तेई वाका अ माउइ’ अशी नावे देण्यात आली आहेत.
newzeland2
न्यूझीलंड देश ऑस्ट्रेलिया खंडाचा भाग नसून वास्ताविक झीलँडीया नामक लहानशा खंडाचा भाग आहे. साधारण साठ मिलियन वर्षांपूर्वी हा लहान खंड ऑस्ट्रेलिया खंडापासून वेगळा झाला असून, या खंडाचा बहुतांश भाग समुद्रामध्ये बुडालेला आहे. २००१ मध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये न्यूझीलंड येथे ‘जेदी’ धर्माचे पालन करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. न्यूझीलंड मध्ये अन्य धर्मियांच्या पेक्षा जेदी धर्मीय लोकांची संख्या जास्त आहे.

Leave a Comment